Thursday, 31 July 2014

बच्चुराम ( मराठी )

आजीने नातवाकरिता लिहीली कविता

ए बच्चुराम
ए बच्चुराम , माहित आहे का तुला ?
धना काकू एक बाळ आणणार तुला ।

असेल का ती एक छोटीशी बार्बी ?
थोडीशीस गोबरी पण हसरी सारखी ।
मोठी झाली की दादा म्हणेल तुला ,
आणी पोर्णिमेला राखी बांधेल तुला ।

असेल का तो एक छोटासा भीम ?
दोघांची  मिळुन तयार होईल टीम ।
दंगा -मस्ती बॅट आणी बाॅल,
की टेनिसच खेळणार घाटेज् आॅल ?

तुझी स्मिता आजी
३०-०७-२०१४



Monday, 28 July 2014

मैत्री ( मराठी कविता )

ही कविता एका पत्नी ने पती ला त्याच्या नोकरीच्या शेवटल्या दिवशी लिहीली आहे ।उद्या पासून ते निवृत्त होणार आहेत ।

मैत्री करून बघा माझ्याशी
प्रिय नवरोजी
मैत्री करून बघा माझ्याशी ,
चांगली मैत्रीण होईन ।
आयुष्याच्या अंतापर्यन्त,
नक्किच साथ देईन ।

मैत्री करून बघा माझ्याशी ,
माझा 'बिनडोकपणा' किंवा तुमचा 'हुश्शारपणा',
आड़ नाहीं येणार ।
मैत्रीत बाकी काही नसणारच मुळी,
फक्त आपलेपणा असणार ।

मैत्री करून बघा माझ्याशी ,
सोडून हा 'नवरे ' पणा ।
बायको ची 'मैत्रीण' झाली की,
वाटेलच आपलेपणा ।

मैत्री करून बघा माझ्याशी ,
मनातल थोड बोला ।
वाटून घेतल आपापसात ,
तर वाढेलच जिव्हाळा ।

मैत्री करून बघा माझ्याशी ,
निवृत्ति नंतर तुम्हालाच सहचारिणी
असावीशी वाटणार ।
मी तर गृहिणीच आहे ,
निवृत्तच नाहीं होणार ।

मैत्री करून तर बघा माझ्याशी ,
" भिऊनको मी तुझ्या पाठीशी आहे "
अस एकमेकांना म्हणणार ,
मैत्रीचा हात हातात असेल
तर अंत सुखाचा येणार ।
मैत्री करून तर बघा माझ्याशी ।
                                           स्मिता घाटे



Friday, 25 July 2014

मेरी नौकरी

मेरी नौकरी
मेरी नौकरी, पैसे कमाने से बहुत कुछ ज़्यादा है।
वह मेरी खुली श्वास है ।
समविचारी सहेलियों का सहवास है ।
जीवन विषय का निरंतर अभ्यास है ।
मेरी नौकरी,
मेरी नौकरी,यह मेरा आत्मविश्वास है ।
अनुभवों का विस्तृत आकाश है ।
ज्ञान का निश्चित विकास है ।
मेरी नौकरी,
यह, घर की चार दिवारी से निकास है ।
यहाँ काम होकर भी आराम का भास है ।
घरेलू झंझटो से छुटकारे का निश्वास है ।
मेरी नौकरी,
यहाँ आवागमन का थोड़ा त्रास है ।
फिर भी नौकरी करते रहने की आस है ।
यह कर्तृत्व सिद्ध करने का प्रयास है ।
मेरी नौकरी,
मेरी नौकरी पैसे कमाने से बहुत कुछ ज़्यादा है ।
                                                           स्मिता घाटे